टोकिओ,28 ऑक्टोबर (पीएसआय)
जपानचे उत्तर शहर हाशिनोहेच्या प्रशासनिक इमारतीच्या शौचालयात कोणीतरी दान स्वरूपात चार कोटी येन (526,000 डॉलर) ची रक्कम सोडली.
एका वृत्तसंस्थेद्वारे आज प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार या रक्कमसोबत मिळालेल्या पत्रात रक्कमेचा उपयोग मार्चमध्ये आलेले भुकंप व त्सुनामी ग्रस्तांची मदत करण्यासाठी करण्याचा निर्देश दिला होता.
शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेनाम व्यक्ती आत येणे व बाहेर जाण्याची माहिती मिळु शकली नाही.
जपानमध्ये ही पहिली घटना नाही जेव्हा एखाद्या बेनाम परोपकारीने शौचालयात धन सोडले आहे.
याप्रकारे 29 सप्टेंबरला एक अज्ञात दाण देण्याने एक सार्वजनिक शौचालयात एक कोटी येन (131,000 डॉलर) सोडले होते. यासोबत मिळालेल्या एका पत्रात रक्कमचा उपयोग भूकंप व त्सुनामी ग्रस्तांच्या हितात खर्च करण्याचा निर्देश दिला होता.
या व्यतिरिक्त वर्ष 2007 मध्ये पुर्ण देशभरात स्थानिक परिषदेच्या इमारतीच्या शौचालयात 400 साध्या पाकीटात 10,000 येन आढळले होते. या बेनाम दान देणाऱ्याची माहिती मिळु शकली नाही.