काही काही व्यक्तींना त्यांनी पाळलेल्या श्वानाविषयी भलतेच प्रेम असते. मॉडेल, फॅशन डिझायनर व समाजसेविका पेट्रा एक्लस्टोन हिने तिच्या पाळीव कुत्र्यांसाठी लॉस एंजिल्समध्ये तब्बल 52 मिलियन पौंडांचे (38.37 कोटी) घर घेतले आहे, डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पेट्राने तिचा बॉयफ्रेंड जेम्स स्टंट याच्यासोबत विवाह केला होता. जगातला सर्वाधिक महागडा विवाह म्हणून त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.