टेक्सासमधील एका प्राणिसंग्रहालयात दोन वाघिणींचे एका वाघावर प्रेम बसले. प्रेमासाठी वाट्टेल ते, ही म्हण त्यांच्या कानावर आधीच गेली असावी. त्यामुळेच प्रेम मिळवण्यासाठी एका वाघिणीने हल्ला करून चक्क वाघाचा बळी घेतला. एक फूल दो मालीची कथा आजवर अनेक बॉलीवूड चित्रपटांधून प्रेक्षकांसमोर आली आहे. नव्या जमान्यात दोन फूल व एकच माळी, असेही प्रकार पाहण्यास मिळाले, पण असा प्रकार प्राणिमात्रांच्या आयुष्यात घडल्याचे तुच्या ऐकिवात आहे काय? ही घटना अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एल पासो येथील प्राणिसंग्रहालयात घडली आहे. या प्राणिसंग्रहालयात मलाया जातीची एक तीन वर्षांची सेरी व सहा वर्षांचा वाघ जुई यांचे प्रेसंबंध जुळले होते. मात्र या प्राणिसंग्रहालयातील 15 वर्षीय वाघिणीला त्या दोघांचे प्रेसंबंध आवडत नव्हते. कारण त्या वाघिणीचेही जुई या वाघावर प्रेम बसले होते. प्राणिसंग्रहालयाचे प्रवक्ता कार्लामार्टिनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी चारच्या सुमारास मेली या वाघिणीने जुईवर जबरदस्त हल्ला केला. वाघांच्या डरकाळयांनी परिसर दणाणून गेला. कर्मचारी घटनास्थळी धावले, परंतु तोपर्यंत वाघ निपचीत पडलेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासले तेव्हा जुईचा मृत्यू झाला होता. प्राणिसंग्रहालयाचे निदेशक स्टीव्ह मार्शल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.