ऑर्डास हे चीनच्या उत्तरेला एक नवीन वसलेले शहर आहे. 26 फेब्रुवारी 2001 रोजी या शहरात अनेक प्रकारच्या प्रेक्षणीय वास्तूंची उभारणी करण्यात आली. इतिहासकालीन मंगोलियन भागात येत असल्याने त्याचे नाव ऑर्डोस असे ठेवण्यात आले. ऑर्डोसचा मंगोलियन भाषेतील अर्थ आहे अनेक महाल. महत्त्वाचे म्हणजे स्र्राट चेंगीझ खानच्या स्मृतीशी या शहराला जोडले जाते. येथे अनेक वास्तू जरी असल्या तरी पर्यटकांव्यतिरिक्त एक माणूसही शहरात दिसत नाही. त्यामुळे याची ओळख घोस्ट सिटी अशी तयार झाली आहे. दुसरीकडे उंची व चकाचक इमारतींमुळे याचा परिचय चीनमधील दुबई असाही करून दिला जातो. हे शहर चीनच्या डाँगशेंग जिल्ह्यात येते. चीनमधील सर्वात श्रीमंत शहर असा लौकिक या शहराला मिळाला आहे. 1.5 दशलक्ष एवढया निवासस्थानांची योजना ऑर्डासमध्ये चीन सरकारने हाती घेतली आहे. यामुळे या भागात लोक राहण्यासाठी येतील. 10 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 2006 पासून त्यांचे बांधकाम सुरू होते. 700 दशलक्ष डॉलर खर्च करून शाही महालांच्या बांधकामाचा प्रकल्प स्थानिक प्रशासनाने हाती घेतला आहे. या महालांची रचना अद्वितीय असेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.