
ऑस्ट्रेलियात जगातील सर्वांत मोठी मगर आढळून आली असून, ती ज्या वेळी समुद्राबाहेर आली तेव्हा बेशुध्दावस्थेत होती. सुरुवातीला ती मृत असेल या समजुतीने लोक तिच्या भोवती जमा झाले होते, पण तिने शेपूट हलवताच सारे जण भयाने पळून गेले. अखेर आग्निंशमन विभागाने ती पूर्ण शुध्दीत येण्याआधीच तिला बांधून टाकले. आता तिला ठेवायचे कोठे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.