ब्रिटनमधील सर्वांत वयोवृध्द स्टंटमॅन म्हणून रॉकी टेलर प्रसिध्द आहेत. त्यांनी 26 वर्षांपूर्वी केलेला स्टंट पुन्हा एकदा वयाच्या 64 व्या वर्षी करून सर्वांना चकीत केले आहे. त्यांनी 40 फूट उंचीच्या इमारतीवरून उडी मारून दाखविली.
1985 मध्ये हॉलीवूड चित्रपट डेथ विशमध्ये एका दृश्यात त्यांना अंगाला आग लावून 40 फूट उंचीवरून उडी मारायची होती. पण हा सीन चुकला आणि रॉकीला मोठया प्रमाणावर भाजले गेले होते. खाली पडल्यानंतर त्यांना मोठा मार लागला होता. पण त्याउप्परही ते वाचले होते. हा सीन शक्य झाला नसल्याची खंत कायम रॉकी यांना लागलेली असायची. त्यामुळे त्यांनी हा स्टंट पुन्हा आजमाविण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या वर्षांत त्यांना हा सीन जमला नाही पण म्हातारपणात त्यांना जमला. जगलो तर जगलो आणि मरण आले तरी चिंता नाही, असा निर्धार करून रॉकी यांनी पुन्हा एकदा हा स्टंट करण्याचे ठरवले होते. तो त्यांनी शक्य करून दाखवला. शेकडो लोकांसमोर त्यांनी 40 फुटांच्या इमारतीवरून उडी मारली.