कँडल लाइटचा उल्लेख झाला की डोक्यात पटकन रोमँटिक डिनरचे स्वप्न तरळते; परंतु अंधारात प्रकाश देणारी मेणबत्तीची ज्योत जेव्हा लखलखते तेव्हा ती शेकडो हिरे बनवते. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा एका मेणबत्तीची ज्योत जळते तेव्हा प्रत्येक सेकंदाला 15 लाख छोटी रत्ने बनतात. मात्र, त्यांचा आकार फार लहान असतो. एवढा लहान की अशी तीन लाख रत्ने एका पिनच्या टोकावर असू शकतात. पापणी लवताच ते अदृश्यही होतात. जर शास्त्रज्ञांनी या रत्नांना एकत्रित करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले तर धमाल होईल. तथापि, सेंट ऍंड्रयूज विद्यापीठाचे शास्त्रज्ञ वुजोंग झोड यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून ही बाब सिध्द करून दाखवली आहे. झोड यांनी ज्योतीपासून निघणारी सर्व सूक्ष्म रत्ने आणि हिऱ्यांना एकत्रित करणारे फिल्टर तयार केले आहे. मेणबत्तीच्या ज्योतीमधले तापमान 1400 डिग्री सेल्सिअस असते. जेव्हा या फिल्टरला ज्योतीवर धरले तेव्हा शुध्द कार्बनचे चारही प्रकार जसे पेन्सिल लीड, डायमंड, ग्रॅफाइट एकत्रित झाले. मेणबत्तीची ज्योत हिऱ्याच्या खाणीसारखी असते. मायकल फेराडे (फादर ऑफ इलेक्टि-सिटी) यांनी दीडशे वर्षांपूर्वी 1860 मध्ये केलेल्या भाषणात या प्रयोगाबाबत सांगितले होते.