Interested News
Monday, 06 April 2009 00:50
सराजेवो : एखाद्या व्यक्तीला कदाचितच हे सहन होईल की एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्यामध्ये पडावे. मग तो अगदी जवळचा नातेवाईक का असेना.
बोस्नियाचा एक सैनिक मिरोस्लाव मिल्जीचीने आपल्या सासूवर ऍंटी-टँक क्षेपणास्त्र केवळ यासाठी डागले,कारण त्याला वाटत होते की, ती (सासू) त्याच्या बायकोला भडकावते. तथापि, हल्ल्यात सासूची जीव वाचला. मिरोस्लावचा आरोप आहे की, त्याची सासू त्याचे लग्न तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. ती नेहमी त्याच्या बायकोला भडकावण्यात गुंतलेली असते. त्यामुळे अतिशय संतापलेल्या मिरोस्लावने एकदाचे सर्वकाही ठीक करण्याचे ठरविले. त्याने आपल्या सासूवर रॉकेट लाँचरने क्षेपणास्त्र डागले. पण सासूचे नशीब चांगले निघाले आणि ती त्या भयानक हल्ल्यातून वाचली. पण प्रकरण येथेच संपले नाही. प्रकरण कोर्टात पोहोचले. सासूचे जिवंत राहणे मिरास्लावला खटकत होते. यावेळी त्याने भर न्यायालयात सासूवर मशीनगनने हल्ला केला. पण सासूचे नशीब पुन्हा एकदा शाबूत निघाले आणि ती वाचली. सध्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात मिरोस्लावला सहा वर्षांची शिक्षा झाली आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी त्याने न्यायालयाला हेच सांगितले की, तो आपल्या सासूला आणखी सहन करु शकत नाही.
Add comment