Interested News
Friday, 03 April 2009 19:19
न्यूयॉर्क : तुम्ही टीव्हीवर नातेवाईक व मित्रांसह फुटबॉल सामना पाहात असाल आणि तेवढयात अचानक पडद्यावर 'ब्लू फिल्म' (अश्लील चित्रपट) सुरु झाली तर नक्कीच परिस्थिती असहनीय होईल. अलिकडेच काही अशाच परिस्थितीतून अमेरिकेच्या एरिजोनाच्या लोकांना जावे लागले आहे.
टीव्हीवर फुटबॉल सामन्याचे थेट प्रसारण पाहत असलेले लोक तेव्हा लज्जित झाले, जेव्हा अचानक पडद्यावर 'ब्लू फिल्म' सुरु झाली. त्यावेळी टीव्हीवर अमेरिकेच्या राष्ट्रीय फुटबॉल लीग सुपर बाउलचे प्रसारण केले जात होते. ही स्पर्धा येथे अतिशय लोकप्रिय आहे. ही पाहण्यासाठी लोक मित्र व नातेवाईकांसाठी पार्टीचे आयोजन करतात. सोबत मुलेही असतात. सामन्यादरम्यान अश्लील चित्रपटाच्या प्रसारणाने लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
दुसरीकडे, प्रसारन केंद्राने या घटनेसाठी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नेमके काय झाले होते, हे अद्याप समजू शकलेले नाही.
Add comment